'इन्फोसिस'कडूनही 'घरवापसी'चे प्रयत्न

कर्माचाऱ्यांची गळती थांबवण्यासाठी, तसेच सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावण्यासाठी इन्फोसिसने नवनवीन शक्कल लढवण्यास सुरूवात केली आहे. यात इन्फोसिस कंपनी सोडून गेलेल्या पहिल्या १०० कर्मचाऱ्यांना सीईओ सिक्का यांनी स्वत:ची स्वाक्षरी असलेले ई-मेल केले आहेत, या 'घरवापसी'ला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Updated: Jan 10, 2015, 02:03 PM IST
'इन्फोसिस'कडूनही 'घरवापसी'चे प्रयत्न title=

मुंबई : कर्माचाऱ्यांची गळती थांबवण्यासाठी, तसेच सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावण्यासाठी इन्फोसिसने नवनवीन शक्कल लढवण्यास सुरूवात केली आहे. यात इन्फोसिस कंपनी सोडून गेलेल्या पहिल्या १०० कर्मचाऱ्यांना सीईओ सिक्का यांनी स्वत:ची स्वाक्षरी असलेले ई-मेल केले आहेत, या 'घरवापसी'ला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

कंपनी एवढ्या वरच थांबलेली नाहीय, आपल्या कंपनीतील मनुष्यबळ कायम रहावं, यासाठी कंपनीतील ३ हजार कर्मचाऱ्यांना कंपनीने 'आयफोन सिक्स'ची भेट दिली आहे.

सीईओ असावा तर असा...

तिमाही वित्तीय निष्कर्ष जाहीर करण्याच्या निमित्ताने कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांनी समूहातील ३ हजार कर्मचाऱ्यांना महागडे आयफोन सिक्स दिले आहेत.

कंपनीचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती समूहात पुन्हा आल्यानंतर इन्फोसिसमध्ये मोठय़ा पदावरील व्यक्ती सोडून जाण्याची संख्या वाढली होती, यात कंपनीचे अनेक सहसंस्थापकही होते. 

विशाल सिक्का यांच्या रूपात कंपनीने प्रथमच समूहाबाहेरचा मुख्य कार्यकारी अधिकारी निवडला. तर मूर्ती यांनीही मोठ्या मनाने आपल्या पुत्रासह कंपनीच्या दैनंदिन कामकाजातून अंग काढून घेतलं आहे.

कंपनीने कर्मचाऱ्यांना शंभर टक्के बोनस देण्याचाही निर्णय घेतला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.