मुंबई : व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं अनेक प्लान्स, अनेक आणभाका एव्हाना तयार झाल्या असतील... पण, सोशल मीडियावर मात्र एक व्हिडिओ वायरल होताना दिसतोय.
हा व्हडिओ सप्टेंबर २०१५ मधला असला तरी तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर दिसतोय... त्याचं कारण आहे प्रेम...
आपल्या मरणासन्न अवस्थेतील पत्नीला आय लव्ह यू म्हणणाऱ्या आणि तिच्यासाठी गाणं गाणाऱ्या एक ९२ वर्षीय वृद्ध या व्हिडिओत दिसतोय... हा व्हिडिओ तुमच्या डोळ्यांत अश्रू उभे करू शकतो.
लॉरा असं या वृद्ध महिलेचं नाव आहे... तिची दृष्टी गेलीय आणि तिचा पती हॉवर्ड तिच्यासाठी गाणं गात आहे... आणि हा क्षण कॅमेऱ्यात कैद केलाय या जोडप्याच्या एरिन सोलारी या नातीनं...