आता, तुमची बाईक पाण्यावरही चालणार...

येत्या काही दिवसांत तुम्हाला इंधन म्हणून पाण्यावर चालणारी बाईक दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका... कारण, असं तंत्रज्ञान विकसीत करण्यात आलंय. ज्यामुळे, तुम्हाला तुमची बाईक पाण्यावर चालू करता येऊ शकेल.

Updated: Jan 16, 2015, 12:45 PM IST
आता, तुमची बाईक पाण्यावरही चालणार... title=

नवी दिल्ली : येत्या काही दिवसांत तुम्हाला इंधन म्हणून पाण्यावर चालणारी बाईक दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका... कारण, असं तंत्रज्ञान विकसीत करण्यात आलंय. ज्यामुळे, तुम्हाला तुमची बाईक पाण्यावर चालू करता येऊ शकेल.

चंदीगडचा रहिवासी असलेल्या गव्हर्नंमेंन्ट स्कूलमध्ये दहावीत शिकणाऱ्या नित्याशीष भंडारीनं हे तंत्रज्ञान विकसीत केलंय. शिक्षकांच्या मदतीनं त्यानं एक बाईक कीट तयार केलंय जे तुमच्या बाईकलाही पाण्यावर चालवू शकाल.४२ व्या 'स्टेट लेव्हल एग्झीबिशन'मध्ये नित्यनं हे बाईक किट प्रदर्शनासाठी ठेवलं होतं. 

हे कीट त्यानं एका बाईकला फीट केलं होतं... या कीटमध्ये २ लीटर पाण्याची क्षमता आहे. यामध्ये पाणी टाकल्यानंतर एचएचओ सेलमध्ये जाईल. इथं इलेक्ट्रोलायसिज केल्यानंतर त्याचं रुपांतर ऑक्सी हायड्रोजन गॅसमध्ये होतं... आणि हे गॅस इंधननं बाईकला चालवता येतं.

पेट्रोलवर चालणाऱ्या इतर बाईकमधून धूर निघतो... पण, या बाईकमधून मात्र पाणी निघेल आणि ते सायलेन्सरमधून निघून जाईल. त्यामुळे, प्रदूणावरही मात करता येईल.

नित्यला हे कीट बनवण्यासाठी तीन आठवडे लागले... त्यानं अवघ्या १९०० रुपयांत हे कीट तयार केलंय. यामुळे, बाईकचा स्पीड ५० किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो... तर ही बाईक पेट्रोलवर चालणाऱ्या बाईकपेक्षा जास्त मायलेजही देते. ही बाईक एक लीटर पाण्यात २५० किलोमीटर चालते.  किटमधलं पाणी संपल्यानंतर तुम्हाला पुन्हा ते पाण्यानं भरावं लागेल. समुद्राच्या पाण्याचाही यामध्ये वापर केला जाऊ शकतो. 

महत्त्वाचं म्हणजे, यापूर्वी नित्यनं एक सोलर एअर कन्डिशनही तयार केलं होतं, त्याचीही बरीच चर्चा झाली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.