देशातील फ्री वाय-फाय सेवा देणारं पहिलं शहर

हैदराबाद देशातील पहिलं वाय-फाय शहर झालं आहे, येथे वाय-फाय इंटरनेट फ्री उपलब्ध केलं जात आहे, तेलंगणा सरकारकडून पब्लिक वाय-फाय सेवेच्या नावाने ही सेवा टेलिकॉम ऑपरेटर कंपनी भारती एअरटेलने उपलब्ध करून दिली आहे. यानुसार शहरातील १७ जागांवर पूर्णपणे फ्री वाय-फाय इंटरनेट सुविधा पुरवली जाणार आहे.

Updated: Oct 13, 2014, 01:07 PM IST
देशातील फ्री वाय-फाय सेवा देणारं पहिलं शहर title=

हैदराबाद: हैदराबाद देशातील पहिलं वाय-फाय शहर झालं आहे, येथे वाय-फाय इंटरनेट फ्री उपलब्ध केलं जात आहे, तेलंगणा सरकारकडून पब्लिक वाय-फाय सेवेच्या नावाने ही सेवा टेलिकॉम ऑपरेटर कंपनी भारती एअरटेलने उपलब्ध करून दिली आहे. यानुसार शहरातील १७ जागांवर पूर्णपणे फ्री वाय-फाय इंटरनेट सुविधा पुरवली जाणार आहे.

या सेवेनुसार हैदराबाद शहरातील १७ ठिकाणी दररोज ७५० एमबी इंटरनेट डेटा मोफत वापरता येणार आहे. या सेवेनुसार इंटरनेटचा स्पीड ४० एमबीपीएस ठेवण्यात येईल. मात्र कधी काळी इंटरनेट वापरणाऱ्या युझर्सच्या संकेत वाढ झाल्यास स्पीड कमी होऊ शकतो.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार वाय-फाय हॉटस्पॉट्सला मधापूर पोलिस स्टेशन, कोथागुडा जंक्शन आणि रहेजा माइंडस्पेस सर्कलच्या सायबर टावर्समध्ये लावण्यात आलं आहे. यानुसार ४० हजार युझर्सना फायदा होण्याची शक्यता आहे.

जो कोणताही वापरकर्ता ज्याच्याकडे मोबाईल आहे, त्या युझर्सला याचा फायदा होणार आहे, यासाठी युझर्सला आपल्या डिव्हाईसचं वाय-फाय ऑप्शन ऑन करावं लागेल, यानंतर मोबाईल नंबर डायल करावा लागेल. यानंबरवर एसएमएस नुसार युझरनेम आणि वन टाईम पासवर्ड पाठवला जाईल.

या युझरनेम आणि पासवर्डचा वापर केल्यानंतर वायफाय सेवा सुरू होणार आहे. सुरूवातीला प्रायोगिक तत्वावर ही सेवा तीन महिन्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. यानंतर युझर्सच्या प्रतिक्रियांच्या आधारावर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.