नवी दिल्ली: अॅमेझॉन आगामी काळात भारतात तब्बल ५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे असं बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचच्या एका नव्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. अॅमेझॉन ने सध्या आगामी सणांना लक्ष्य ठेवून १० हजार नवे स्टोअर्स सुरु केले आहेत.
अॅमेझॉन इंडियाची गेल्या काही महिन्यांपासून फ्लिपकार्टच्या तुलनेत जास्त विक्री झाली आहे. त्यामुळे २०१९पर्यंत अॅमेझॉन इंडियाचा विस्तार ३७ %नी वाढ होण्याची शक्यता रिपोर्टमधून व्यक्त केली जात आहे.
या रिपोर्टमध्ये फ्लिपकार्ट आपले अव्वल स्थान कायम राखेल असेही म्हटले आहे. अॅमेझॉनला मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादामुळे त्याचा सर्वाधिक फटका स्नॅपडील आणि इतर छोट्या ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपनीना होणार आहे.
या स्टोअर्सच्या माध्यमातून कंपनी आपली वितरण व्यवस्था अधिकच मजबूत करत आहे. या संख्येमुळे अॅमेझॉनच्या भारतातील एकूण स्टोअर्सची संख्या १२ हजार ५०० पर्यंत पोहचली आहे.
तसेच आगामी सणासुदीच्या काळानिमित्त आपली धोरणे निश्चित केली असून amazon.com ने आपल्या ‘आय हॅव स्पेस’ कार्यक्रमासाठी १० हजार नवे स्टोअरस सुरु केले आहेत.