मुंबई: अॅपलच्या गॅजेट्सबद्दलची उत्सुकता सर्वांनाच असते. आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लसच्या भरघोस यशानंतर आता अॅपल १२.९ इंचीच्या आयपॅडवर काम करत आहे. यादरम्यानच जापानंचं मॅगझिन मेक-फनच्या रिपोर्टनुसार अॅपल पुढील वर्षी २०१५मध्ये एप्रिल ते जून दरम्यान १२.२ इंचीचा आयपॅड लॉन्च करण्याची शक्यता आहे.
एका प्रसिद्ध इंग्रजी वर्तमानपत्रातील रिपोर्टनुसार, मेक फन मॅगझिनमध्ये सांगितलं गेलंय की, अॅपलचा हा नवा आयपॅड A-9 प्रोसेसर युक्त असेल. सोबतच त्यात चार स्पीकर असतील.
मेक-फन तेच मॅगझिन आहे, ज्यानं iphone 6 आणि iphone 6 प्लसच्या लॉन्चिंगपूर्वी त्याचे काही फोटो पब्लिश केले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.