मुंबई : महाभारतात तुम्ही बकासुराचे नाव ऐकलेच असेल. तो भलमोठा राक्षस होता. तो मोठ्या प्रमाणात खात असल्याने त्याचे नाव बकासुर होते. बकासुर नावाच्या राक्षसाप्रमाणेच हल्ली बकासूर नावाची थाळी सध्या व्हायरल होतेय.
ही थाळी इतकी मोठी आहे पाच ते सहा मोठ्या माणसांचे पोट भरु शकते. गुजरात शहरांतील हॉटेलमध्ये ही थाळी मिळण्यास सुरुवात झाल्याची माहिती आहे. या थाळीमध्ये विविध १०० प्रकारचे पदार्थ असतात.
यात ५५ प्रकारच्या शाही भाज्या, २१ प्रकारच्या मिठाया असतात. या थाळीची किंमत तर आश्चर्य वाटण्यासारखी आहे. या एका थाळीची किंमत १५०० रुपये इतकी आहे.