'हा काळ...', ब्रेस्ट कॅन्सरच्या तिसऱ्या स्टेजविषयी सांगितल्यानंतर पोस्ट शेअर करत हिना खान भावूक

Hina Khan Emtional Post :  हिना खाननं काही दिवसांपूर्वी तिला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्याचे सांगितले होते. अशात आता हिना खाननं आणखी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 30, 2024, 12:45 PM IST
'हा काळ...', ब्रेस्ट कॅन्सरच्या तिसऱ्या स्टेजविषयी सांगितल्यानंतर पोस्ट शेअर करत हिना खान भावूक  title=
(Photo Credit : Social Media)

Hina Khan Emtional Post : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आणि सगळ्यांची लाडकी अक्षरा उर्फ हिना खान ही ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. तीन दिवस आधी तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्याविषयी सुरु असलेल्या या अफवांवर तिनं अखेर पूर्णविराम लावला आहे. अशा परिस्थितीत ती सगळ्याशी लढा देण्यासाठी तयार आहे. पण या बातमीनं सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. तिला कॅन्सरचं निदान झाल्याच्या बातमीनंतर आता हिनानं आणखी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. 

हिना खाननं ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. या स्टोरीत तिनं म्हटलं आहे की 'हा काळ देखील जाणार...' त्यासोबत तिनं स्मायली आणि हार्टचं इमोजी वापरलं आहे. तिला मिळालेलं समर्थन आणि प्रेमाचे ती आभार मानताना दिसते. त्यासोबत तिनं बॅकग्राऊंडला रणबीर कपूरच्या 'संजू' या चित्रपटातील  'कर हर मैदान फतेह' हे गाणं लावलं आहे. चाहत्यांचं म्हणणं आहे की ती जरी दु:खी असेल तरी तिनं हिंम्मत सोडलेली नाही. 

hina khan new emotional post after Stage 3 breast cancer know in detail

हिनानं शुक्रवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. हिनानं या पोस्टमध्ये लिहिलं की 'सगळ्यांना नमस्कार, समोर आलेल्या अफवांनुसार, मला सगळ्या हिनाहोलिक्सला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, जे माझ्यावर प्रेम करतात आणि त्यांना माझी काळजी आहे.'

हिनानं पूढे सांगितलं की 'मला स्टेज तीनचा ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. संघर्षमय असलेल्या या आजाराविषयी कळल्यानंतर मला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे की मी ठीक आहे. या आजाराला हरवण्यासाठी मी तयार आहे, त्यासाठी मी हवे तेवढे प्रयत्न करते. माझ्यावर उपचार सुरु आहे आणि यातून मी नक्कीच जे काही अपेक्षीत आहे करण्यासाठी तयार आहे.'

हेही वाचा : पुण्यातील पब्स आणि बारवर महापालिकेची कारवाई पाहताच अभिनेत्याची खोचक टीका म्हणाला...

36 वर्षांच्या हिनानं तिच्यासाठी खूप प्रेम आणि प्रार्थना करा असं सगळ्यांना सांगितलं. पुढे ती म्हणाली, 'मला नक्कीच विश्वास आहे की मी या आव्हानावर मात करेन आणि पूर्णपणे स्वस्थ राहिन. हिनाच्या या पोस्टवर बॉलिवूडपासून छोट्या पडद्यावरील सगळ्यात कलाकारांनी कमेंट करत तिच्यासाठी प्रार्थना मागत असल्याचे म्हटले.  हिनाला अक्षरा या भूमिकेतून प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं.