कॉम्प्युटर लॉन इन करताना सावधान

जगभरातील जवळपास शंभर देशात झालेला सायबर हल्ल्याची तीव्रता नव्या आठवड्याची सुरुवातीला आणखी वाढण्याची भीती आहे. शुक्रवारचा दिवस हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी काळा दिवस ठरला होता. कारण आतापर्यंतचा सगळ्यात मोठा रॅन्समवेअर व्हायरसचा हल्ला शुक्रवारी झाला होता.

Updated: May 15, 2017, 08:36 AM IST
कॉम्प्युटर लॉन इन करताना सावधान title=

मुंबई : जगभरातील जवळपास शंभर देशात झालेला सायबर हल्ल्याची तीव्रता नव्या आठवड्याची सुरुवातीला आणखी वाढण्याची भीती आहे. शुक्रवारचा दिवस हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी काळा दिवस ठरला होता. कारण आतापर्यंतचा सगळ्यात मोठा रॅन्समवेअर व्हायरसचा हल्ला शुक्रवारी झाला होता.

भारतासह जवळपास दीडशे देशात वॉनक्राय या रॅन्समवेअर या व्हायरसने अक्षरक्षा धुमाकूळ घातला. हॅकर्सने केलेल्या हल्ल्यात जवळपास 2 लाख कॉम्प्युटर्स बाधित झाले. या हल्ल्याचा सर्वात जास्त फटका इंग्लंडला बसला. इंग्लंडमधील हॉस्पिटल्स आणि टेलिफोन यंत्रणा यामुळे खिळखिळी झाली होती. त्यामुळे सकाळी कामावर लॉग इन करताना काळजी घेण्याचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

रॅनसमवेअर हा वायरस असून तो कॉम्प्युटर निकामी करून टाकतो. तसंच कॉम्प्युटर वाचवण्यासाठी एका ठराविक किंमतीची मागणी हॅकर्सकडून केली जात आहे.. या पार्श्वभूमीवर विविध कंपन्या, शेअर बाजार, हॉस्पिटल्समध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. जगभरातल्या हॅकरविरोधी यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.