मुंबई : यू ट्यूब सब्स्क्राईब म्हणजे काय असा प्रश्न सोशल मीडियावर अनेक वेळा विचारण्यात येतो. यूट्यूब व्हिडीओंचं अपडेट मिळवण्यासाठी ही सेवा आहे.
पहिल्यांदा आपण जाणून घेऊ या की, यू ट्यूबवर विविध विषयांवर चॅनेल्स असतात, ते आपल्या सारख्या इंटरनेट वापरकर्त्यांनी बनवलेली असतात. त्या चॅनेल्सला तुम्ही हवं ते नाव देऊ शकतात, असं नाव जे यापूर्वी कुणी घेतलं नसेल, ठेवलं नसेल.
यू-ट्यूब चॅनेल तयार करण्यासाठी तुम्ही youtube.com लॉगइन केलं असेल, तर उजव्या बाजूला तुमच्या जीमेल आयडीने साईन इन करा. हे तुमचं यूट्यूब चॅनेल आहे. यात तुम्ही हवा तो व्हिडीओ अपलोड करू शकतात. अट मात्र एक आहे. तो तुम्ही शूट केलेला असावा, त्यातलं संगीतही तुमचं असावं. म्हणजे कॉपीराईटचा नियम बारकाईने लागू आहे.
जर तुम्ही कॉपीराईट नियमाकडे दुर्लक्ष केलं आणि कुणा दुसऱ्याचे तीन पेक्षा जास्त व्हिडीओ अपलोड केले, किंवा दुसऱ्याचं संगीत असलेले ३ व्हिडीओ अपलोड केले, तर समजा, तुमचं हे चॅनेल दिसेनासं होईल.
आपला सर्वात महत्वाचा मुद्दा हा होता की, यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याचा आपल्याला फायदा काय? ज्या प्रकारे तुम्ही व्हॉटस अॅपच्या ग्रुपमध्ये सहभागी होतात, तसंच हे काहीसं आहे. जर तुम्हाला झी २४ तासने अपलोड केलेल्या व्हिडीओंचं अपडेट हवं असेल, तर यूट्यूबवर झी २४ तास चॅनेलवर जा, आणि उजव्या बाजूला व्हिडीओवर अथवा चॅनेलच्या नावावर जिथे घंट्याचं चित्र आहे, त्यावर क्लिक करा आणि सब्स्क्राईबवर क्लिक करा.
सब्स्क्राईब केल्यानंतर तुम्हाला झी २४ तासने जेव्हाही कोणता नवीन व्हिडीओ अपलोड केला, तेव्हा एक अलर्ट पडेल. बेल वाजेल. आणि याचा एक मेलही तुमच्या जीमेलच्या सोशल सेक्शनला पडेल, तेव्हा यू-ट्यूबर तुमची आवडती चॅनेल्स सब्स्क्राईब करा आणि अपडेट राहा.