नवी दिल्ली : जर तुम्ही सिंगल आहात आणि एखाद्या मित्राला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत पाहिल्यास मनात नक्कीच ईर्षा निर्माण होते. मात्र गर्लफ्रेंड न होण्याचे हे ही आहेत फायदे. गर्लफ्रेंड नाही म्हणून जर तुम्ही दुखी असाल तर ही बातमी वाचून नक्कीच आनंद होईल.
हे आहेत गर्लफ्रेंड न होण्याचे फायदे
गर्लफ्रेंड न असण्याचे फायदे म्हणजे तुम्ही कधीही, कुठेही आणि कोणासोबतही फिरु शकता. तुम्हाला कोणी सांगणार नाही की याच्यासोबत फिरू नको, इथे जाऊ नकोस.
गर्लफ्रेंड न अस्ण्याचा दुसरा फायदा असा की तुम्हाला कधीही मित्रांसोबत फिरायला जाता येईल. तसेच तुम्ही नाईट आउटही करु शकता. यावेळी तुम्हाला कोणाला उत्तर देण्याची गरज पडणार नाही.
गर्लफ्रेंड नसण्याचा तिसरा फायदा म्हणजे तुम्हाला मनाप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य असते. तुम्हाला सतत कोणी टोकणारे नसते.
चौथा फायदा असा की तुम्ही किती खर्च करावा, किती बचत करावी याबाबत कोणीही लेक्चर देणारे नसते. तुम्हाला हव्या त्या वेळी तुम्ही हवी ती वस्तू खरेदी करु शकता. ही वस्तू का घेतली, याचा फायदा काय असं विचारणारं कोणी नसतं.
गर्लफ्रेंड नसल्यास तुमचा अतिरिक्त खर्च वाचतो. तसेच तुम्ही तुमच्या कामावर अधिक फोकस करु शकता. माझ्यासाठी तुझ्याकडे वेळच नाही, तुझे माझ्याकडे लक्षच नाही, असेही तुम्हाला कोणी बोलू शकत नाही.