मुंबई : ग्राहकांना मोबाइलवरून मॅसेज आणि चॅटिंग करण्यासाठी गुगलही मोबाइल मेसेजिंग अॅप उपलब्ध करून देणार आहे. हे अॅप कधीपर्यंत उपलब्ध होणार आणि त्याचं नाव काय असेल हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.
गुगलचा प्रतिस्पर्धी फेसबुकसोबत स्पर्धा करण्याच्या दृष्टीने गुगलने हे अॅप विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुकचं 'व्हॉट्स अॅप', टेनसेंटची 'वी चॅट' सध्या अनेक लोकं वापरतात. गुगलचदेखील 'हँग आउट' आहे पण स्पर्धेत येण्यासाठी गुगल हे नवं अॅप विकसित करणार आहे.