मुंबई: कोणत्याही कंपनीसाठी भारतीय बाजार कायमच आकर्षण राहिला आहे. मोबाईल फोन्सच्या बाबतीत तर भारतीय बाजार गेली काही वर्षे प्रचंड गतीने वाढतो आहे.
अँड्रॉईड फोन्सच्या बाबतीत भारतीय बाजारात कंपन्यांची प्रचंड चढाओढ आहे. आता कॅनेडीयन कंपनी 'ब्लॅकबेरी' पुन्हा एकदा भारतात त्यांचे फोन उतरवायला सज्ज झाली आहे. पण आता ते त्यांचा 'प्राइव' हा अँड्रॉईड फोन भारतात आणणार आहेत.
येत्या २८ जानेवारीला कंपनी हा फोन भारतात लाँच करेल अशी माहिती कंपनीतर्फे देण्यात आली आहे. अँड्रॉईड मार्केटात आपलं स्थान बळकट करण्यासाठी कंपनी हे पाऊल ऊचलते आहे.
या फोनला १८ मेगापिक्सेलचा कॅमेरा असेल. ३ जीबी चा रॅम असलेला हा फोन ३२ मेमरी सोबत येईल. यात 4G कनेक्टीवीटीचीही सोय असेल.
येत्या वर्षभरात अजून एक अँड्रॉईड फोन भारतात आणण्याचा कंपनीचा मानस आहे.