३३९ रुपयांत प्रतिदिन २ जीबी इंटरनेट डेटा

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता इतर कंपन्याही कमी दरात इंटरनेट डेटा उपलब्ध करुन देतायत. भारत दूरसंचार निगम लिमिटेडही ग्राहकांना स्वस्त दरात इंटरनेट डेटा उपलब्ध करुन देत आहे.

Updated: Mar 16, 2017, 08:34 PM IST
३३९ रुपयांत प्रतिदिन २ जीबी इंटरनेट डेटा title=

मुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता इतर कंपन्याही कमी दरात इंटरनेट डेटा उपलब्ध करुन देतायत. भारत दूरसंचार निगम लिमिटेडही ग्राहकांना स्वस्त दरात इंटरनेट डेटा उपलब्ध करुन देत आहे.

बीएसएनएलने नवा ३३९ रुपयांचा प्लान लाँच केलाय. यात तुम्हाला दिवसाला २ जीबी ३जी डेटा मिळणार आहे तसेच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही आहे.

कंपनीने गुरुवारी हा नवा प्लान लाँच केला. तसेच २८ दिवसांपर्यंत ग्राहक प्रतिदिवस २ जीबी डेटा वापरु शकणार आहेत. ही ऑफर ९० दिवसांसाठी सीमित असणार आहे. 

बीएसएनएलने हा नवा प्लान लाँच करताना इतर कंपन्यांच्या डेटा प्लानच्या तुलनेत हा नवा प्लान सर्वात चांगला असल्याचे म्हटलेय.