मुंबई : तुम्ही जर स्मार्टफोन यूझर्स असाल... आणि ‘बॅटरी लवकर संपल्यानंतर काय’ ही तुमचीही समस्या असेल तर या समस्येपासून तुम्हाला ‘प्रोन्तो’ नावाचा पॉवर पॅक तुमची समस्या नष्ट करू शकतो.
‘प्रोन्तो’ तुमचा स्मार्टफोन बघता बघता चार्ज करतो... आयफोन-५ सारखे स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी केवळ पाच मिनिटं लागतात... पाच मिनिटांत बॅटरी फूल चार्ज होते.
कंपनीनं ‘प्रोन्तो पॉवर पॅक’चे दोन मॉडल बाजारात उतरवलेत. ‘प्रोन्तो-५’ आणि ‘प्रोन्तो-१२’... ‘प्रोन्तो’चे हे दोन्ही मॉडेल केवळ एका तासात चार्ज होतात. प्रोन
‘प्रोन्तो-५’
* ‘प्रोन्तो-५’मध्ये ४५०० मेगाहर्टझची बॅटरी लावलेली आहे
* त्यामुळे, प्रोन्तो-५ एकदा चार्ज झाल्यानंतर तीन वेळा आयफोन-५ चार्ज करू शकतो
* यामध्ये हाय-पॉवर २.४ ए यूएबी पोर्ट आहे
* वजन – २७० ग्रॅम
* लांबी, रुंदी, जाडी – ५.५ X २.५५ X ०.७८
* किंमत – ९९ डॉलर (जवळपास ६००० रुपये)
‘प्रोन्तो-१२’
* तर ‘प्रोन्तो-१२’मध्ये १३,५०० ची बॅटरी आहे. तर ‘प्रोन्तो-१२’ आयफोन-५ नऊ वेळा चार्ज करू शकतो.
* यामध्ये ड्युएल हाय-पॉवर २.४ ए यूएसबी पोर्ट दिला गेलाय.
* वजन – ५२० ग्रॅम
* लांबी, रुंदी, जाडी – ५.१ X २.५५ X १.६५
* किंमत – १४९ डॉलर (जवळपास ९१०० रुपये)
यामध्ये १२v अॅडाप्टर आहे, ज्यामुळे तुम्ही लॅपटॉप, टॅबलेट आणि डीएसएलआर कॅमेराही तुम्ही चार्ज करू शकाल. कंपनीनं प्रोन्तो भारतासहीत काही देशांत टेस्ट केलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.