स्मार्टफोन घेण्याआधी या गोष्टी तपासून घ्या

स्मार्टफोन आज अनेकाच्या हातातली गरज झाली आहे. आज अनेक गोष्टी स्मार्टफोनमुळे सहज झाल्या आहेत. आज बाजारात अनेक कंपनीचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणता स्मार्टफोन घ्यायचा या बाबत सगळ्यांना कन्फ्यूजन असतं. 

Updated: Jan 3, 2016, 05:49 PM IST
स्मार्टफोन घेण्याआधी या गोष्टी तपासून घ्या title=

मुंबई : स्मार्टफोन आज अनेकाच्या हातातली गरज झाली आहे. आज अनेक गोष्टी स्मार्टफोनमुळे सहज झाल्या आहेत. आज बाजारात अनेक कंपनीचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणता स्मार्टफोन घ्यायचा या बाबत सगळ्यांना कन्फ्यूजन असतं. 

फीचर्स : बजेट स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी त्यातील फीचर्स तपासून घ्यावेत. कंपनी स्मार्टफोन विकण्यासाठी अनेक फीचर्स त्यामधून काढून टाकतात. जसे 4 जीबी इंटरनल स्टोरेजमध्ये तुम्ही फक्त 2 जीबी वापरू शकता. फोन खरेदी करण्यापूर्वी सर्व फीचर्स तपासून घ्या. फोनमधून वायफाय डायरेक्ट, नवं ब्लूटूथ हे फीचर्स काढलेले असू शकतात. 

हार्डवेअर : स्मार्टफोन घेतांना हार्डवेअर स्पेसिफिकेशन तपासून घ्या. ऑक्टा कोअर प्रोसेसर, रॅम जेवढा जास्त तेवढा चांगला आणि स्टोअरेज चेक करून घ्या.  डिस्प्ले साईज आणि रिझॉल्यूशन, कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स, बॅटरी कपॅसिटी याही गोष्टी तपासून घ्या. 

ऑपरेटिंग सिस्टम : स्मार्टफोन घेण्याआधी ऑपरेटिंग सिस्टम तपासून घ्या. जुने ऑपरेटिंग सिस्टम वाले फोनही बाजारात असतात. 

सर्विस सेंटर : अनेक स्मार्टफोनला एका वर्षाची वॉरंटी असते. पण जर सर्व्हिस सेंटर जवळ नसेल तर या वॉरंटीचा फायदा नाही. त्यामुळे सर्विस सेंटर जवळ असणे गरजेचे आहे. कारण अनेक स्मार्टफोनचे पार्टस मिळत नाही.