चायनीज मोबाईल चार्जरचा करंट लागून विद्यार्थ्याचा मृत्यू

तुम्ही जर चायनीज मोबाईल चार्जरचा वापर करत असला तर सावधान. कारण चायनीज मोबाईल चार्जर तुमच्यासाठी जीवघेणा होऊ शकतो. उत्तर प्रदेशात लखनऊ येथे एका विद्यार्थ्याचा बळी गेला.

Updated: Aug 13, 2015, 03:19 PM IST
चायनीज मोबाईल चार्जरचा करंट लागून विद्यार्थ्याचा मृत्यू title=

लखनऊ : तुम्ही जर चायनीज मोबाईल चार्जरचा वापर करत असला तर सावधान. कारण चायनीज मोबाईल चार्जर तुमच्यासाठी जीवघेणा होऊ शकतो. उत्तर प्रदेशात लखनऊ येथे एका विद्यार्थ्याचा बळी गेला.

लखनऊमधील काकोरी परीसरात पदवीधर सौरभ पांडे हा आपला मोबाईल चायनीज चार्जरने चार्ज करीत होता. यावेळी त्याला करंट लागला आणि तो चिकटला. त्यात त्याचा मृत्यू झाला. सौरभ हा भाड्याच्या घरामध्ये आपल्या आईसोबत राहत होता.

एका शेजाऱ्यांने सांगितले की, पहिल्या माजल्यावर काम सुरु होते. त्यामुळे भितींला ओलसरपणा आला होता. सौरभच्या मित्र अभिषेकने सांगितले,  त्याच्या मोबाईलचा ओरिजिनल चार्जर काही दिवसांपूर्वी हरवला होता. त्यामुळे सौरभने चायनीज चार्जर खरेदी केला. तो मोबाईल चार्ज करताना त्याला करंट लागला होता, हे त्याला समजले होते.

त्यानंतर मंगळवारी तो चार्जिंगने अनप्लग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा हाथ केबलला चिकटला. मी माझ्या मुलाचा हात झाडूच्या मदतीने बाजुला केल्याचे तिच्या आईने सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.