लॉस एन्जेलिस : आपल्या स्मार्टफोनमधून सेल्फी काढणं आणि हेच सेल्फी आपल्या मित्रांसोबत शेअर करत आठवणी शेअर करणं तुम्हाला आवडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच...
तुमचा हाच स्वभाव तुम्हाला 'कूल' म्हणून ओळख देऊ शकतो. एका अभ्यासात ही गोष्ट समोर आलीय. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या संशोधनकर्त्यांनी आपल्या अभ्यासात हे मांडलंय. त्यांच्या म्हणण्यानुसार, रोज काही खास सेल्फी काढणं आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करणं लोकांवर तुमचा सकारात्मक प्रभाव टाकू शकतं. या व्यक्तीमत्वाची ओळख लोकांत आनंदी व्यक्तीमत्व म्हणून होते.
युनिव्हर्सिटीचे पोस्ट डॉक्टरेट आणि लेखक यू चेन यांच्या म्हणण्यानुसार, आमचा अभ्यास तरी हेच दाखवतोय की स्मार्टफोननं सेल्फी घेणं आणि लोकांशी शेअर केल्यानं लोकांवर सकारात्मक विचारांचा प्रभाव पडतो.
शोधकर्त्यांनी सेल्फीचा समजून घेण्यासाठी ४१ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून चार आवड्यांपर्यंत अभ्यास केला. यात २८ मुली आणि १२ मुलांचा समावेश होता.