तीन हजाराचा मोबाईल... अन् वर्षभर इंटरनेट फ्री!

स्वस्त दरात मोबाईल फोन उपलब्ध करून देणाऱ्या 'डेटाविंड' या कंपनीनं आपल्या ग्राहकांना आणखी एक खुशखबर दिलीय. 

Updated: Jan 27, 2015, 06:58 PM IST
तीन हजाराचा मोबाईल... अन् वर्षभर इंटरनेट फ्री! title=

मुंबई : स्वस्त दरात मोबाईल फोन उपलब्ध करून देणाऱ्या 'डेटाविंड' या कंपनीनं आपल्या ग्राहकांना आणखी एक खुशखबर दिलीय. 

स्वस्त मोबाईलसोबतच मोफत इंटरनेट सुविधा ग्राहकांना मिळाली तर... ही कल्पनेतली योजना डेटाविंडनं प्रत्यक्षात आणलीय.

कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, खाजगी दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडून मोफत बेसिक इंटरनेट सेवा देणारा मोबाईल लॉन्च करण्यासाठी चर्चा सुरू आहे. ही मोफत इंटरनेट सेवा एका वर्षासाठी असेल. यानुसार, मोबाईलची किंमत तीन हजारांपर्यंत असेल.

सुरू असलेल्या ट्रेन्डनुसार, जवळपास 76% भारतीय ग्राहक 4 हजार रुपयांहून कमी किंमतीतला मोबाईल तर 60 टक्के ग्राहक 2 हजारांहून कमी किंमतीचा मोबाईल खरेदी करण्यात रस दाखवतात. यापैंकी अनेक ग्राहकांना इंटरनेटची आवश्यकताही नसते. त्यामुळेच कंपनीनं या ग्राहकांना इंटरनेटचा वापर करण्याची संधी देऊ केलीय. फेब्रुवारीपर्यंत ही डील फायनल होण्याची शक्यता आहे. 

आकाश टॅबलेट बनवणाऱ्या 'डेटाविंड' या कंपनीनं याआधीही ग्राहकांना यूबीस्लेट (ubislate) टॅबलेटवर एक वर्षापर्यंत फ्री अनलिमिटेड इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.