फेसबुकचं सर्वर तासभर डाउन, युजर्स त्रासले

सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकचं सर्वर डाउन झालंय. फेसबुक युजर्स यामुळं खूपच त्रासलेले आहेत. फेसबुक वापरतांना युजर्सना 'webpage is not available'असा मॅसेज येतोय.

Updated: Jan 27, 2015, 12:56 PM IST
फेसबुकचं सर्वर तासभर डाउन, युजर्स त्रासले title=

मुंबई: सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकचं सर्वर डाउन झालंय. फेसबुक युजर्स यामुळं खूपच त्रासलेले आहेत. फेसबुक वापरतांना युजर्सना 'webpage is not available'असा मॅसेज येतोय.

आज जवळपास ११.४५ वाजता फेसबुकचं सर्वर डाउन झालंय आणि युजर्सना फेसबुक वापरण्यात त्रास होतोय. यासोबतच इंस्टाग्रामचं सर्वर सुद्धा डाउन झालंय. वेब पेज पहिले उघडलं आणि नंतर 'connection is timed out'चा मॅसेज येतोय. 

फेसबुकचं सर्वर डाऊन होताच लोकांनी ट्विटरवर याची तक्रार करायला सुरूवात केलीय. फेसबुकवर #FacebookDown हा ट्रेंड सुरू आहे. हा प्रॉब्लेम कधी सुरळीत होईल हे अजून फेसबुकतर्फे सांगण्यात आलेलं नाही. अमेरिका, आशिया आणि ऑस्ट्रेलियातील युजर्सना या सर्वर डाउनचा सामना करावा लागतोय. 

यापूर्वीही फेसबुक काही महिन्यांपूर्वी डाउन झालं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.