अवघ्या तीन हजारांत ४जी स्मार्टफोन, वर्षभर इंटरनेट फ्री

स्वस्त स्मार्टफोन उपलब्ध करुन देणारी डेटाविंड ही मोबाईल कंपनी पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये स्वस्त ४ जी स्मार्टफोन लाँच करणार आहे. याची किंमत अवघी तीन हजार रुपये असणार आहे. त्यासोबतच पहिले १२ महिने इंटरनेट फ्री दिेले जाणार आहे. 

Updated: Dec 14, 2015, 09:03 AM IST
अवघ्या तीन हजारांत ४जी स्मार्टफोन, वर्षभर इंटरनेट फ्री title=

नवी दिल्ली : स्वस्त स्मार्टफोन उपलब्ध करुन देणारी डेटाविंड ही मोबाईल कंपनी पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये स्वस्त ४ जी स्मार्टफोन लाँच करणार आहे. याची किंमत अवघी तीन हजार रुपये असणार आहे. त्यासोबतच पहिले १२ महिने इंटरनेट फ्री दिेले जाणार आहे. 

तीन हजार रुपयांतील हँडसेट पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये लाँच करत आहोत. यात १२ महिन्यांसाठी ४जी ब्राऊजिंग फ्री दिले जाणार आहे. मात्र डाऊनलोड अथवा व्हिडीओ मोफत असणार नसल्याचे डेटाविंडचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीत सिंह तुली यांनी सांगितले. 

डेटाविंड ४जी हँडसेटसाठी विविध मोबाईल कंपन्यांशी चर्चा सुरु आहे. ४०जीच्या श्रेणीत इतक्या कमी किंमतीत उपलब्ध होणारा हा सर्वात स्वस्त हँडसेट असेल. सध्या ४जीचा स्वस्त हँडसेट ४ हजार रुपयांना उपलब्ध आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.