सायबर पॉर्न मुकाबल्यासाठी पोलिसांचे नवे अस्त्र - USB स्टिक

भारतीयांमध्ये पॉर्न पाहण्याची सवय वाढत आहे ही चिंतेची बाब आहे. पॉर्न पाहण्याच्या व्यसनाने काही मनोवैज्ञानिक आजार होत आहेत, दरम्यान आता दिल्ली पोलिसांनी सायबर क्राईम आणि पॉर्नोग्राफीविरोधात लढण्यासाठी कंबर कसली आहे. 

Updated: Jan 28, 2016, 04:27 PM IST
सायबर पॉर्न मुकाबल्यासाठी पोलिसांचे नवे अस्त्र - USB स्टिक title=

नवी दिल्ली : भारतीयांमध्ये पॉर्न पाहण्याची सवय वाढत आहे ही चिंतेची बाब आहे. पॉर्न पाहण्याच्या व्यसनाने काही मनोवैज्ञानिक आजार होत आहेत, दरम्यान आता दिल्ली पोलिसांनी सायबर क्राईम आणि पॉर्नोग्राफीविरोधात लढण्यासाठी कंबर कसली आहे. 

इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार दिल्ली पोलिसांनी पोर्न कन्टेंटला रिकव्हर करण्यासाठी एक नवीन डिव्हाइस वापर करणार आहे. या डिव्हाइसच्या माध्यमातून कम्प्युटरमधील डिलीट पॉर्न कन्टेंट रिकव्हर केले जाऊ शकते. 

दिल्ली पोलिसांनी म्हटले की, हे डिव्हाइस सायबर क्राइमशी लढण्यासाठी हे डिव्हाइस खरेदी करणार आहे. या डिव्हाइसच्या माध्यमातून कम्प्युटरवरील डिलिट करण्यात आलेली अश्लील सामुग्री पुन्हा रिकव्हर करता येणार आहे. या माध्यमातून सेक्स क्रिमिनलला पकडता येणार आहे. 

अॅडल्ट सामुग्री सापडली तर तुम्हांला शिक्षाही होऊ शकते. या नव्या यूएसबी स्टिकच्या माध्यमातून कम्प्युटरमधील पॉर्न इमेज, व्हिडिओ, चॅट डिटेल्स डिलीट केल्या असतील तरी त्या रिकव्हर करता येणार आहेत.