उशीखाली फोन ठेवून झोपण्याची सवय असेल तर...

अनेकांना झोपताना मोबाईल फोन उश्याशी ठेवून झोपण्याची सवय असते. तुम्हालाही ही सवय असेल तर ताबडतोब बंद करा. न्यूयॉर्क पोलिसांनी उशीखाली झालेल्या मोबाईल स्फोटाची काही फोटो ट्विटरवर पोस्ट केलेत. 

Updated: Feb 21, 2016, 12:04 PM IST
उशीखाली फोन ठेवून झोपण्याची सवय असेल तर... title=
सौजन्य - ट्विटर

मुंबई : अनेकांना झोपताना मोबाईल फोन उश्याशी ठेवून झोपण्याची सवय असते. तुम्हालाही ही सवय असेल तर ताबडतोब बंद करा. न्यूयॉर्क पोलिसांनी उशीखाली झालेल्या मोबाईल स्फोटाची काही फोटो ट्विटरवर पोस्ट केलेत. 

यात त्यांनी महत्त्वाचा संदेशही दिलाय. झोपताना अथवा चार्जिंग करताना तुमचा सेलफोन उशीखाली ठेवू नका. सुरक्षितता बाळगा असे त्यांनी यात म्हटलेय. या पोस्टसोबतच स्फोट झालेल्या मोबाईलचे फोटोही पोस्ट करण्यात आलेत. 

यात मोबाईलच्या स्फोटामुळे चादर तसेच उशीही जळाल्याचे दिसतेय. त्यामुळे हा स्फोट किती भयानक असू शकतो याची प्रचिती येते. स्मार्टफोन वापरणं काळाजी गरज असली तरी या वापरताना काळजी घेणे गरजेचे असते.