'फ्रीडम २५१'च्या बुकिंगमधून कंपनीने कमावले तब्बल ७२ कोटी रुपये

नवी दिल्ली : जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोनचा दावा करणारी कंपनी 'रिगिंग बेल्स'ने आपला 'फ्रीडम २५१' फोन बाजारात उतरवला आणि एकच धुमाकूळ सुरू झाला.

Updated: Feb 21, 2016, 11:36 AM IST
'फ्रीडम २५१'च्या बुकिंगमधून कंपनीने कमावले तब्बल ७२ कोटी रुपये title=

नवी दिल्ली : जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोनचा दावा करणारी कंपनी 'रिगिंग बेल्स'ने आपला 'फ्रीडम २५१' फोन बाजारात उतरवला आणि एकच धुमाकूळ सुरू झाला. या फोनच्या बुकिंगसाठी उडालेल्या ऑनलाईन झुंबडीमुळे कंपनीची वेबसाईटही बंद पडली. 

पण, तरीही या फोनची उत्सुकता कमी होताना काही दिसत नाही. या कंपनीने फोनच्या बुकिंगमधून घसघशीत कमाई केली आहे. देशभरात आजपर्यंत २५ लाख लोकांनी या फोनचे बुकिंग केले आहे. शनिवारी कंपनीने फोनचे बुकिंग बंद केले होते. या लहानशा काळातील बुकिंगमधून कंपनीने तब्बल ७२ कोटी रुपयांची पुंजी जमवली आहे.

कंपनीचे एमडी मोहित गोयल यांच्या म्हणण्यानुसार मार्च महिन्यात नोएडा आणि उत्तराखंड या दोन ठिकाणी कंपनी त्यांच्या फोनचे उत्पादन सुरू करणार आहे. १० एप्रिल ते ३० जून या काळात फोनचे वितरण केले जाईल. 

भाजप खासदार किरीट सोमैय्या यांनी मात्र हा प्रकार म्हणजे एक महाघोटाळा असल्याचे म्हटले आहे.