मुंबई : सोशल नेटवर्किंग साइट फेसबूकवर तुम्ही फक्त चॅट, मित्र बनवणे या व्यतिरिक्त पैसे देखील कमवू शकणार आहात. फेसबूक पोस्टने पैसा तर तुम्ही कमावू शकणारच आहात पण त्याच बरोबर एखाद्या योजनेसाठी देखील तुम्ही पैसे मिळवू शकता.
फेसबूकने यूजर्सला या माध्यमातून पैसे देखील कमावता यावे म्हणून पर्याय देण्याची योजना आखली आहे. 'टिप जार' नावाचं एक ऑप्शनने तुम्ही पैसे कमावू शकता. या माध्यमातून तुम्ही पैसे देखील दान करु शकणार आहात. कंटेटसाठी तुम्ही स्पॉन्सरशिप किंवा अॅड देखील मिळवू शकता. यामध्ये तुम्ही पार्टनरशिप देखील करु शकता.
फेसबूक पोस्टवर 'कॉल टू अॅक्शन' या ऑप्शनने तुम्ही तुमच्या फॉलोअर्सला देखील साइन-अप करु शकता. कोणतीही पोस्ट खरेदी करण्यासाठी देखील तुम्ही त्याला सांगू शकणार आहात. फेसबूकचं हे फीचर फक्त वेरिफाईड यूजर्ससाठी असू शकतं.