नवी दिल्ली : सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकनं आपल्या यूझर्सना व्हिडिओ शेअरिंगची जास्तीत जास्त ओढ लावण्याचं चांगलंच मनावर घेतलेलं दिसतंय. यासाठी नुकतंच फेसबुकनं एक टूलही निर्माण केलंय.
व्हिडिओ बनवून ते आपल्या मित्रांशी-मैत्रिणींशी शेअर करण्यासाठी 'फेसबुक'चं हे नवं टूल तुमची मदत करणार आहे. फेसबुकनं या नव्या टूलचं नामकरण केलंय 'से थँक्स'...
यूझर्सना आपल्या आणि आपल्या मित्रांच्या टाईमलाईनवर विशिष्ट रुपात निर्माण केलेला व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी आणि इतरांशी तो शेअर करण्यासाठी हे टूल मदत करेल.
तुम्हालाही तुमचा व्हिडिओ बनवायचा असेल तर फेसबुक डॉट कॉम/थँक्स इथं भेट द्या आणि व्हिडिओचा प्रीव्ह्यू बनविण्यासाठी फेसबुकवरूनच एका फ्रेंडची निवड करा.
यावर तुम्ही एक वेगळी थीमची निवड कराल ज्याद्वारे तुम्ही असे फोटो एडिट आणि पोस्ट कराल जे तुमची मैत्री किती घट्ट आहे हे दाखविण्याचा प्रयत्न केला जाईल, असं फेसबुकच्या एका ब्लॉग पोस्टवर याबद्दल लिहिण्यात आलंय.
फेसबुक युझर्स आपला व्हिडिओ पूर्ण बनवल्यानंतर तो आपल्या टाईमलाईनवर पोस्ट करू शकतील आणि मित्रांना यामध्ये टॅगही करू शकतील. याआधी, अशा आपल्या खास मित्रासाठी आणि त्याच्या मैत्रीसाठी एक खास मॅसेजही तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहचवता येईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.