फेसबुकचे पत्रकारांसाठी खास अॅप 'सिग्नल'!

पत्रकार मित्रांनो तुमच्यासाठी फेसबुकने खास बातमी दिली आहे. पत्रकारांसाठी खास अॅप लॉन्च केलेय. त्यामुळे तुम्हाला नव नविन ट्रेंड, फोटो, व्हिडिओ आदींबाबत सहज माहिती मिळणे शक्य होणार आहे.

Reuters | Updated: Sep 18, 2015, 05:20 PM IST
फेसबुकचे पत्रकारांसाठी खास अॅप  'सिग्नल'! title=

नवी दिल्ली : पत्रकार मित्रांनो तुमच्यासाठी फेसबुकने खास बातमी दिली आहे. पत्रकारांसाठी खास अॅप लॉन्च केलेय. त्यामुळे तुम्हाला नव नविन ट्रेंड, फोटो, व्हिडिओ आदींबाबत सहज माहिती मिळणे शक्य होणार आहे.

फेसबुकने पत्रकारांसाठी हे 'सिग्नल' अॅप सुरु केले आहे. मीडियाला सातत माहितीची आवश्यकता असते. यासाठीच जगभरातील काही पत्रकारांनी बातमीसाठीची महत्वाची माहिती पत्रकारांना उपलब्ध करून देण्याबाबत फेसबुकला कळविले होते.

अधिक वाचा : फेसबुकवर आता 'डिसलाईक'

त्यानुसार फेसबुकने 'सिग्नल' अॅप लॉन्च केलेय. या अॅपद्वारे फेसबुक तसेच इन्स्टाग्रामवरील सांस्कृतिक, मनोरंजन, क्रीडा तसेच इतर सर्व विषयांवर बातमीच्या संदर्भातील माहिती देण्यात येणार आहे. 

अधिक वाचा : नको असलेल्यांना फेसबुक फ्रेन्डलिस्टमधून एका मिनिटात हटवा

फेसबुकवर सतत चर्चेत असलेला विषय, त्यासंबंधीचा व्हिडिओ, छायाचित्रे आदी माहिती या अॅपद्वारे उपलब्ध होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.