मुंबई : स्वाईप टेक्नॉलॉजीनं एक नवा स्मार्टफोन एलाईट नोट लॉन्च केलाय. हा स्मार्टफोन तुम्हाला खरेदी करायचा असल्यास ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल.
उल्लेखनीय म्हणजे, हा स्मार्टफोन युनिव्हर्सल रिमोटप्रमाणेही वापरता येईल. म्हणजेच तुम्ही तुमच्या घरातील टीव्ही आणि एसीसारख्या वस्तूही या स्मार्टफोनवर कंट्रोल करू शकाल.
डिस्प्ले : ५.५ इंचाचा एचडी डिस्प्ले
स्क्रीन : २.५ डी कर्व्ह
प्रोसेसर : १.३ गीगाहर्टझ क्वाड कोअर मीडियाटेक
ऑपरेटींग सिस्टम : ५.५ लॉलीपॉप
रॅम : ३ जीबी
सिम : ड्युएल सिम सपोर्ट
रिअर कॅमेरा : १३ मेगापिक्सल, एलईडी फ्लॅशसहीत, ऑटोफोकस, f/2.0 अपर्चर
फ्रंट कॅमेरा : ५ मेगापिक्सल
इंटरनल मेमरी : १६ जीबी, मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने ३२ जीबी पर्यंत वाढवणं शक्य
कनेक्टिव्हिटी : ४जी LTEसहीत वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि मायक्रो यूएसबी सपोर्ट
बॅटरी : ३००० मेगाहर्टझ
या फोनची बॅटरी १४ तासांचा टॉकटाईम बॅकअप देईल, असा दावा कंपनीनं केलाय. या फोनची किंमत आहे ७९९९ रुपये...