ओपो फाइंड7 आता फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध

चायनिज स्मार्टफोन कंपनी ओप्पो इंडियानं आपला स्मार्टफोन ऑनलाइन विक्रीसाठी चीनची घरगुती इ-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवर आणलाय. फ्लिपकार्टसोबत ओप्पोनं आघाडी केल्याची घोषणा केलीय. 

Updated: Aug 27, 2014, 09:04 AM IST
ओपो फाइंड7 आता फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध title=

मुंबई: चायनिज स्मार्टफोन कंपनी ओप्पो इंडियानं आपला स्मार्टफोन ऑनलाइन विक्रीसाठी चीनची घरगुती इ-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवर आणलाय. फ्लिपकार्टसोबत ओप्पोनं आघाडी केल्याची घोषणा केलीय. 
कंपनीच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार दोन्ही कंपन्यांच्या आघाडी अंतर्गत फ्लिपकार्ट आपल्या वेबसाइटवर ओप्पो एन-1 आणि 4जी स्मार्टफोन ओप्पो फाइंड 7 सह देशात आतापर्यंत सादर झालेले सर्व रेंजचे स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहे. 

ओप्पो फाइंड 7 क्यूएचडी स्क्रीन, 50 एमपी एचडी फोटोग्राफी आणि बॅटरीला लगेच चार्ज करणाऱ्या तंत्रज्ञानासह सुसज्ज आहे. 

ओप्पो मोबाइल्स इंडियाचे सीइओ टॉम लूनं सांगितलं, “दिवसेंदिवस अधिकाधिक ग्राहक ऑनलाइन खरेदी करत आहेत हेच लक्षात घेऊन आम्ही फ्लिपकार्टसोबत भागिदारी केलीय. म्हणजे ओप्पोचे स्मार्टफोन आणि अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकेल.”

ओप्पो फाइंड7 चे फीचर्स  

ओप्पो फाइंड 7 भारतीय बाजारामधील असा पहिला स्मार्टफोन आहे जो HD नाही तर QHD डिस्प्ले वाला आहे. ज्याचं पिक्सेल रिझॉल्यूशन 1440x2560 असेल जे साधारण HD रिझॉल्यूशन 1080x1920 पिक्सेल पेक्षा खूप जास्त आहे. या फोनचा डिस्प्ले 5 इंच असेल सोबतच 538 पिक्सेल रेटवर इंच असेल. 

या फोनची दुसरं वैशिष्ट्य म्हणजे फोनचा कॅमेरा, ओप्पो फाइंड 7 50 मेगापिक्सेलपर्यंतच्या फोटोला सपोर्टिव्ह आहे. जो स्मार्टफोनच्या इतिहासात सर्वात जास्त आहे. फोनचा रिअर कॅमेरा 13 मेकापिक्सेल असून याचा सुपर झूम मोड आपलं मन जिंकेल. फोनमध्ये LED फ्लॅश आहे आणि फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सेल आहे. 

फाइंड 7मध्ये 2.5GHz क्वॉर्डकोर स्नॅपड्रॅगन... फोनचं ऑपरेंटिंग सिस्टिम 4.3 जेलीबीन आहे आणि रॅम 3GB आहे. फोनची इंटरनल मेमरी 32GB आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.