मोझिलाने आणला स्वस्त स्मार्टफोन

इंटरनेट ब्राऊझर मोझिलाने भारतात कमीत कमी किमतीचा स्मार्टफोन बाजारात उतरवला आहे. या फोनची किंमत फक्त 1 हजार 999 रूपये आहे. हा फोन फक्त ऑनलाईन खरेदी केला जाऊ शकतो. या फोनची ऑनलाईन विक्री शॉपिंग वेबसाईट स्नॅपडील करणार आहे.

Updated: Aug 26, 2014, 09:22 PM IST
मोझिलाने आणला स्वस्त स्मार्टफोन title=

मुंबई : इंटरनेट ब्राऊझर मोझिलाने भारतात कमीत कमी किमतीचा स्मार्टफोन बाजारात उतरवला आहे. या फोनची किंमत फक्त 1 हजार 999 रूपये आहे. हा फोन फक्त ऑनलाईन खरेदी केला जाऊ शकतो. या फोनची ऑनलाईन विक्री शॉपिंग वेबसाईट स्नॅपडील करणार आहे.

इंटेक्स क्लाऊड एफएक्स नावाचा हा स्मार्टफोन मोझिला फायरफॉक्स ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. या पद्धतीने काम करणारा हा आशियातील पहिला स्मार्टफोन आहे. स्वस्त स्मार्टफोनच्या दृष्टीकोनातून जगभरात भारताला सर्वात मोठी बाजारपेठ मानलं जात आहे.

मोझिलाने यावर म्हटलंय, इंटेक्स क्लाउड एफएक्स बाजारात उतरवण्याचा आमचा उद्देश आहे, जे सामान्य लोक अजूनही कमी किमतीत स्मार्ट फोन येईल, अशा अपेक्षेत आहेत., त्या ग्राहकांपर्यंत पोहचण्याचा आमचा उद्देश आहे, ते स्वस्त स्मार्ट फोन खरेदी करू शकतील हाच आमचा उद्देश आहे.

जाणकारांच्या मते, या पद्धतीचा स्मार्टफोन या लोकांसाठी एक सूवर्ण संधी असेल, जे सामान्य लोक फीचर असलेले स्मार्ट फोन वापरू इच्छीतात, ज्यावर इंटरनेट चालू शकेल. तसं पाहिलं तर स्वस्त स्मार्टफोन्समध्ये तेवढे फीचर नसतात जेवढे, ऐपलच्या आयफोन आणि सॅमलंग गॅलेक्सीत असतात.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.