मुंबई : तरुण-तरुणी आजकल खूप लवकर प्रेमात पडतात. पण अनेकदा आपण कोणाच्या तरी प्रेमात पडलो आहोत की नाही हेच कळत नाही. प्रेमात पडल्यानंतर मुलींच्या वागण्यात बदल होतो. पाहा काय करतात मुली.
१. जर तुमच्यामध्ये दोघांमध्ये भांडण झालं आणि काही वेळातच मुलीचा जर तुम्हाला फोन येतो आणि ती याबाबत तुमच्याशी माफी मागते. तर ती मुलगी तुमच्यावर प्रेम करते.
२. जी मुलगी तुम्हाला नेहमी फोन करते, मॅसेज करते तिला तुमच्या सोबत वेळ घालवायला आवडतो. तुम्ही अनेकांसोबत जरी असाल तरी ती तुमच्या बाजूला किंवा समोरच बसते.
३. जी मुलगी तुम्ही जर तिला वेळ दिला नाही तर तुमच्यावर चिडते किंवा रागावते तर ती तुमच्या प्रेमात पडली आहे.
४. तुमचं एखादं बोलणं ती खूप मनावर घेत असेल आणि तुमच्या प्रत्येक बोलणं ती लक्षपूर्वक ऐकत असेल तर ती तुमच्या प्रेमात पडली आहे.
५. जी मुलगी याआधी कधीच दिसण्याकडे लक्ष देत नव्हती. पण काही दिवसानंतर ती अचानक दिसण्याकडे किंवा मेकअपला अधिक महत्त्व द्यायला लागली तर ती मुलगी प्रेमात पडली आहे.