या अपडेटमुळे २५ टक्क्यांनी वाढणार क्रोम ब्राउजरचा स्पीड

गुगलचे क्रोम ब्राउजर इंटरनेटच्या इतर ब्राउजरच्या तुलनेत फास्ट चालते. आता गुगल क्रोम ब्राउजरचा स्पीड वाढवण्यासाठी यात नवीन अपडेट आणतयं. हे एक असे अल्गोरिदम आहे जे कंटेटला कप्रेस करते. या अपडेटमुळे क्रोम ब्राउजरचा स्पीड २५ टक्क्यांनी वाढेल असा दावा गुगल करतंय.

Updated: Jan 22, 2016, 09:57 AM IST
या अपडेटमुळे २५ टक्क्यांनी वाढणार क्रोम ब्राउजरचा स्पीड title=

नवी दिल्ली : गुगलचे क्रोम ब्राउजर इंटरनेटच्या इतर ब्राउजरच्या तुलनेत फास्ट चालते. आता गुगल क्रोम ब्राउजरचा स्पीड वाढवण्यासाठी यात नवीन अपडेट आणतयं. हे एक असे अल्गोरिदम आहे जे कंटेटला कप्रेस करते. या अपडेटमुळे क्रोम ब्राउजरचा स्पीड २५ टक्क्यांनी वाढेल असा दावा गुगल करतंय.

क्रोम ब्राउजरमध्ये ब्रोटली समाविष्ट केले जाणार आहे.  या प्रोग्रामचा फायदा क्रोम ब्राउजर व्यतिरिक्त अँड्रॉईड स्मार्टफोन्सनाही होईल. या नव्या व्हर्जनमुळे कंप्रेस कंटेट जलदगतीने लोड होण्यास मदत होईल.

मोबाईल यूझर्सलाही याचा अधिक फायदा होईल. कंटेट कंप्रेस केल्याने डेटा ट्रान्सफरसाठी चार्ज कमी लागतील तसेच बॅटरीही कमी खर्च होईल.