गुगलने दाखवला भारताचा चुकीचा नकाशा

सर्वे इंडिया नुसार जगातील सर्वात मोठे इंजिन म्हणून ज्याची ओळख आहे ते 'गुगल'. या गुगलवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. 

Updated: Dec 15, 2014, 08:38 PM IST
गुगलने दाखवला भारताचा चुकीचा नकाशा title=

नवी दिल्ली : सर्वे इंडिया नुसार जगातील सर्वात मोठे इंजिन म्हणून ज्याची ओळख आहे ते 'गुगल'. या गुगलवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. 
हल्लीच केलेल्या एका सर्वेतून समोर आले आहे की गुगलच्या विविध साईट्सवर असणारा भारताचा नकाशा हा चुकीचा आहे. भारताच्या नकाशात आंतरराष्ट्रीय सीमांचे रेखांकन हे चुकीचे केले गेलयं
यासाठी भारत सरकारद्वारे गुगल कंपनीवर आरोप लावण्यात आले आहेत. यानंतर यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. 
भारत सरकारचं असं म्हणणं आहे की भारताचा असा चुकीचा नकाशा दाखवणे हा भारताचा अपमान असल्यासारखंच आहे. अशा कामासाठी गुगल कंपनीवर कायदेशीर कारवाई नक्कीच केली जाईल.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.