BSFमध्ये १२वी पास उमेदवारांना संधी, ६२२ रिक्त पदे भरणार

BSFमध्ये (सीमा सुरक्षा दल) बारावी पाससाठी भरती करण्यात येणार आहे. एएसआय आणि हेड कॉन्टेबल यांची ६२२ पदे भरण्यात येणार आहेत.  उच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेय.

Updated: Apr 9, 2016, 11:10 AM IST
BSFमध्ये १२वी पास उमेदवारांना संधी, ६२२ रिक्त पदे भरणार title=

मुंबई : BSFमध्ये (सीमा सुरक्षा दल) बारावी पाससाठी भरती करण्यात येणार आहे. एएसआय आणि हेड कॉन्टेबल यांची ६२२ पदे भरण्यात येणार आहेत.  उच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेय.

सीमा सुरक्षा दलामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांची पदे भरण्यात येणार आहे. यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अधिक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याच ठिकाणी अर्जही उपलब्ध आहे.

मागासवर्गीयांसाठी ५० रुपये शुल्क असून एससी, एसटी वर्गासाठी प्रवेश अर्ज मोफत आहे. पगार ५,२०० रुपये ते २०,२०० रुपये आहे. अर्ज करण्याबाबत अधिक माहिती www.bsf.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.