सिमकार्ड विकत घेताना आता आधार क्रमांक गरजेचा!

लवकरच मोबाईल सिम कार्ड खरेदी करताना तुम्हाला तुमच्या आधार कार्डाचा नंबर द्यावा लागू शकतो. कारण, केंद्र सरकार सध्या मोबाईल सिम कनेक्शनला आधार क्रमांकाला जोडण्याच्या विचारात आहे. 

Updated: Oct 29, 2014, 09:59 AM IST
सिमकार्ड विकत घेताना आता आधार क्रमांक गरजेचा! title=

नवी दिल्ली : लवकरच मोबाईल सिम कार्ड खरेदी करताना तुम्हाला तुमच्या आधार कार्डाचा नंबर द्यावा लागू शकतो. कारण, केंद्र सरकार सध्या मोबाईल सिम कनेक्शनला आधार क्रमांकाला जोडण्याच्या विचारात आहे. 

यामुळे, फसवणूक करणाऱ्या उपभोक्त्यांना वापरातून सहज बाहेर करता येऊ शकेल तसंच दहशतवादी कारवाया, खंडणी किंवा इतर गुन्ह्यांत मोबाईल फोन्सच्या दुरुपयोगाला आळा घालण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचं ठरू शकतं. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारनं मोबाईल सिमकार्ड खरेदी करताना आधार क्रमांक अनिवार्य करण्याची योजना बनवलीय. त्यामुळे, मोबाईल फोनच्या दुरुपयोगावर लक्ष ठेवता येणं शक्य होऊ शकेल. आधार योजनेचा पुनर्विचार करताना उच्च अधिकाऱ्यांनी नव्या आणि जुन्या मोबाईल फोन कनेक्शनला आधार क्रमांकाशी जोडणं अनिवार्य करणं योग्य ठरेल, असं मत व्यक्त केलंय. 

यापूर्वी, गृह मंत्रालयानं व्हेरिफिकेशनसाठी आधार क्रमांक ही एकमेव ओळख म्हणून वापरण्यात चिंता व्यक्त केली होती. परंतु, यामुळे लाभार्थींना आपली ओळख कोणत्याही वेळी, कधीही आणि कोणत्याही व्हेरिफिकेशनसाठी वापरणं सोपं जाईल, असं सांगत मंत्रालयानं आधार योजनेचं समर्थन केलं होतं. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार सिम कार्डाला आधार क्रमांकाशी संलग्न करण्यावर हळूहळू का होईना पण कारवाई करणार आहे कारण, देशातील काही भाग असाही आहे ज्यांच्याकडे हा विशेष ओळख क्रमांक अजून पोहचलेला नाही.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.