मायक्रोसॉफ्टनं लॉन्च केला ड्युअल सिम मोबाइल फोन ‘नोकिया १३०’

मायक्रोसॉफ्ट डिव्हाइसनं आज दोन सिम असलेला मोबाइल फोन नोकिया-१३० लॉन्च केलाय. याची किंमत फक्त आणि फक्त १,६४९ एवढी आहे. 

PTI | Updated: Oct 27, 2014, 07:13 PM IST
मायक्रोसॉफ्टनं लॉन्च केला ड्युअल सिम मोबाइल फोन ‘नोकिया १३०’ title=

नवी दिल्ली: मायक्रोसॉफ्ट डिव्हाइसनं आज दोन सिम असलेला मोबाइल फोन नोकिया-१३० लॉन्च केलाय. याची किंमत फक्त आणि फक्त १,६४९ एवढी आहे. 

नोकिया इंडियाचे विक्री व विपणन संचालक रघुवंश स्वरूप यांनी सांगितलं की, नोकिया-१३० त्या ग्राहकांसाठी खूप चांगला आहे, जे पहिल्यांदा मोबाइल फोन घेऊ इच्छितात. खूप चांगली बॅटरी असणारा हा फोन आहे. विशेष म्हणजे नोकिया इंडिया सेल्स मायक्रोसॉफ्ट मोबाइल ओवाईची उपकंपनी आहे. 

नोकिया १३०मध्ये १.८ इंचीचा रंगीत डिस्प्ले आहे. याचं स्टँड बाय टाइम ३६ दिवस आहे. कंपनीनं दावा केलाय की, एकवेळा पूर्ण चार्ज केल्यानंतर २जी नेटवर्कवर १३ तासांचा टॉक टाइम किंवा ४६ तास म्युजिक प्ले बॅक किंवा १६ तास व्हिडिओ प्ले बॅक हा फोन देईल. आजपासून हा फोन १,६४९ रुपये किमतीला विक्रीसाठी उपलब्ध आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.