मुंबई : स्वतंत्र्य दिवसाच्या या महिन्यात गूगल हिंदीसह इतर भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी एक खास उपक्रम राबवत आहे. हा उपक्रम भाषांतराशी संबंधित आहे. १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात गूगल हिंदीसह सर्व भाषांवर लक्ष केंद्रीत करणार आहे. गूगलचे सध्याचे सीईओ देखील भारतीय वशांचे सुंदर पिचई हे आहेत.
भारतात आजही ९५ टक्के लोकं भारतीय भाषांचा वापर करतात. पण इंटरनेटवर ही स्थिती उलटी आहे. इंटरनेटवर ९५ टक्के कंटेट हा इंग्रजीत असतो. फक्त ५ टक्के कंटेट हिंदी आणि अन्य भारतीय भाषांमध्ये जनरेट होतो. पण ही स्थिती आता बदलणार आहे. भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
गूगल भारतात त्यांची ट्रान्सलेट कम्युनिटीला आणखी मजबूत करु इच्छितो. २ भाषा येत असलेला व्यक्ती यामध्ये आपला सहभाग नोंदवू शकतो. उदा. जसं की तुम्हाला हिंदी आणि इंग्रजी येते तर तुम्ही छोटी छोटी वाक्य ट्रान्सलेट करु शकता.तुम्ही एक-दूसऱ्याला ट्रांसलेशनसाठी मदत देखील करु शकता.
तुम्ही ट्रांसलेट केलेल्या शब्दांची गुणवत्ता देखील तुम्ही तपासू शकता. या लिंकवर जावून तुम्ही ते तपासू शकता.
क्लिक करा : गूगल उपक्रम
गूगल ऑगस्ट महिन्यातील प्रत्येक कॉन्ट्रिब्यूटर (योगदानकर्ता)च्या ट्रांसलेशनचं संपूर्ण रेकॉर्ड देखील ठेवणार आहे. गूगलसोबत तुम्ही देखील तुमच्या मातृभाषेच्या प्रसारासाठी मदत करु शकता. यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंकवर जाऊन हा फॉर्म भरायचा आहे.