नवी दिल्ली : टू व्हीलरसाठी प्रसिद्ध 'हीरो' कंपनीनं आपली एक नवी कोरी इको-फ्रेंडली स्कूटर लॉन्च केलीय. 'फ्लॅश' असं या स्कूटरचं नाव असून ती अगदी सामान्यांच्या खिशाला परवडणारी आहे.
पर्यावरणाची काळजी घेणाऱ्या ग्राहकांना नजरेसमोर ठेऊन हिरोनं ही स्कूटर बाजारात उतरवलीय. ही एक इलेक्ट्रिक स्कूटर आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ती 65 किलोमीटरपर्यंत जाऊ शकेल, असा दावा कंपनीनं केलाय.
या स्कूटरमध्ये 250 वॉटची मोटर आहे यात 48-Volt 20 Ah VRLA ची बॅटरी आहे... आणि उल्लेखनीय म्हणजे, यात पूर्णत: शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन देण्यात आलंय.
फ्लॅन दोन रंगांत उपलब्ध असेल. सीटच्या खालच्या बाजुला स्टोरेज कंपार्टमेंटही देण्यात आलंय. या स्कूटरचं वजन फक्त 87 किलो आहे.
या स्कुटरची दिल्लीमध्ये शोरुम किंमत 19,990 रुपये आहे. यामध्ये मॅग्नेशिअम अलॉय व्हील, टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि फूल बॉडी क्रॅश गार्ड देण्यात आलाय.