नवी दिल्ली : देशातील प्रतिष्ठित इंजिनियरिंग संस्था आयआयटीमध्ये यावेळी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी पाठ दाखवलीय. यावेळी ६५० जागा रिकाम्या राहिल्या असून अदयाप कोणीही प्रवेश घेण्यासाठी आले नाहीय.
एका हिंदी वर्तमानपत्रानुसार, आयआयटीजेईई अॅडवान्स कौन्सिलिगचे प्रमुख एम. के पाणिग्रही यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात ९,७११ जागेपैकी ९,०६१ जागांसाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर आणखी एका प्राध्यापकानं सांगितलं की, ही संख्या तर त्या विद्यार्थ्यांची आहे ज्यांनी प्रवेश घेतला नाहीय. अजून अनेक विद्यार्थी आपला प्रवेश मागे घेणार आहेत.
गेल्या वर्षीपासून आयआयटीमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी आपला प्रवेश परत मागे घेत आहेत. याचं कारण आहे की, विद्यार्थी आयआयटीच्या बदली एनआयटी किंवा त्याहून चांगल्या प्रायव्हेट इंजिनिअरिंग महाविद्यालयात प्रवेश घेतात. आणखी कारण म्हणजे, दक्षिण भारतातील आयआयटीमध्ये उत्तर भारतातील विद्यार्थी खाण्या-पिण्याच्या कारणांनी प्रवेश घेत नाहीत. तर काही विद्यार्थ्यांच्या पालकांना असं वाटतं की, एवढ्या लांब आपल्या मुलांनी शिकण्यास जाऊ नये.
यंदा आयआयटीमध्ये काही विषयांचं शिक्षणही बंद करण्यात आलंय. त्याचं कारण म्हणजे त्या विषयासाठी कोणतेही विद्यार्थी प्रवेश घेत नाहीत आणि काही वेळा विद्यार्थी ते शिक्षण अर्धवट सोडून देतात. विद्यार्थ्यांना वाटतं की, भारतात या विषयांचा अभ्यास करुन काही भविष्य नाहीय.
सध्या मुंबई आयआयटी सर्वात पसंतीचे इंजिनिअरिंग महाविद्यालय आहे. यात प्रवेश घेण्यासाठी सर्वात जास्त अर्ज केले जातात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.