झोलो Q500s-आयपीएस स्मार्टफोन भारतात लॉन्च

Updated: Jul 6, 2014, 08:35 PM IST
झोलो Q500s-आयपीएस स्मार्टफोन भारतात लॉन्च title=
फाईल फोटो

 

 

नवी दिल्ली : झोलोने 'Q500s- आयपीएस' स्मार्टफोन भारतात लॉन्च झालाय. त्याची किंमत ५९९९ रुपये आहे. झोलोनं या स्मार्टफोनच्या डिझाईनवर खास जोर  दिलाय. काळा, हिरवा, निळा, लाल आणि पांढरा, अशा अनेक रंगात तो उपलब्ध करुन दिलाय. 

वैशिष्टय-

४.४ किटकॅट अॅन्ड्रॉईड 
ड्युएल सिम
८०० X 480 रिझोल्युशन असलेला ४ इंच आयपीएस डिसप्ले
१.३ गीगाहार्ज
क्वॉड कोर मीडियाटेक प्रोसेसर
४०० एमपी २ जीपीयू आणि ५१२ एमबी रॅम
एलईडी फ्लॅशसोबत ५ मेगापिक्सेल कॅमरा
०.३ मेगापिक्सेल फ्रंन्ट कॅमेरा
४ जीबी इंटरनल स्टोरेज
३२ जीबी मायक्रो एसडी कार्ड वापरु शकतो. 
१५०० एमएएच बॅटरी

२जी, ३जी, वाय-फाय, मायक्रो-यूएसबी, ब्लुटूथ, जीपीएस/ ए-जीपीएस कनेक्टिव्हिटीची सुविधा आहे. मोबाईल फोनची लांबी, रुंदी, जाडी १२५ x 63.2x8.98  मिलीमीटर आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.