बंगळुरू : ५९९ रूपयात आयफोन देण्याचं सांगून एका ऑनलाईन वेबसाईटने अनेकांना गंडा घातला आहे, याप्रकरणी बंगळुरू पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतलं आहे.
ऑनलाईन शॉपिंग करतांना ५९९ रूपये आयफोनसाठी ग्राहकाने दिल्यानंतर, त्याला आयफोन देण्यास नकार दिला जात होता, तसेच या बदल्यात दुसरं काही तरी निवडा असं सांगण्यात येत होतं, बंगळुरू पोलिसांना याची सूचना ट्ववीटरवर एका व्यक्तीने दिली.
ही साईट बीगसॉप bigsop.in या नावाने काम करते, एका बीपीओच्या माध्यमातून या वेबसाईटचं काम पाहिलं जातं. या कंपनीच्या खात्यावर ७५ लाख रूपये मिळाले आहेत.
आणखी किती रूपये जमा झाले होते, याचा पोलिस शोध घेत आहेत, या कंपनीचा मालक आणि तीन व्यवस्थापकांना ताब्यात घेण्यात आलं आहे, तीनही जणांचं वय ३० वर्षांच्या आत आहे. या कंपनीचं स्वत:चं सर्वर नव्हतं, त्यामुळे पोलिसांना तपास करण्यात अडचणी येत होत्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.