आता व्हॉट्स अॅपवरील ‘ब्लू टिक’चं टेंशनही घालवा!

भारतच नव्हे संपूर्ण जगात दररोज वापरात येणारी सेवा म्हणजे व्हॉट्स अॅप मॅसेजिंग... व्हॉट्स अॅपनं नुकतीच आपली 'रिड रिसीट' सेवा सुरू केलीय. यामुळं आपण कोणाचा आलेला मॅसेज वाचला, किंवा आपण पाठवलेला समोरच्यांनी वाचला तर ब्लू टीक येते. पण यामुळं अनेकांना त्रास होऊ लागलाय. 

Updated: Nov 16, 2014, 11:13 AM IST
आता व्हॉट्स अॅपवरील ‘ब्लू टिक’चं टेंशनही घालवा! title=

मुंबई: भारतच नव्हे संपूर्ण जगात दररोज वापरात येणारी सेवा म्हणजे व्हॉट्स अॅप मॅसेजिंग... व्हॉट्स अॅपनं नुकतीच आपली 'रिड रिसीट' सेवा सुरू केलीय. यामुळं आपण कोणाचा आलेला मॅसेज वाचला, किंवा आपण पाठवलेला समोरच्यांनी वाचला तर ब्लू टीक येते. पण यामुळं अनेकांना त्रास होऊ लागलाय. 

मी मॅसेज वाचलाच नाही, विसरलो, राहून गेलं... ही कारणं आता देता येत नाहीय. पण असे कारणं देणाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. व्हॉट्सअॅपचे युझर्स आता हे ब्लू टिक डिसेबल करु शकतात. यासाठी तुम्हाला प्रायव्हसी सेटिंग्जमधून जाऊन 'रिड रिसीट' हा ऑप्शन डिसेबल करावा लागेल. फक्त हा ऑप्शन ऑफ केल्यावर युझर्सनी दुसऱ्यांचे मेसेज वाचले तरी चॅट बॉक्समध्ये ब्लू टिक दिसणार नाहीत.

Settings > Privacy > Disable the ‘Read Receipts’ option

हे डिसेबल केल्यानंतर व्हॉट्सअॅप युझर्सनी मेसेज वाचल्यानंतरही ब्लू टिक दिसणार नाही. हे सेवा 'लास्ट सीन'सारखीच आहे. युझर्सनी स्वत:चं 'लास्ट सीन' ऑफ केल्यावर तर त्यांना दुसऱ्यांचं 'लास्ट सीन' जसं दिसत नाही, तसंच युझर्सनी दुसऱ्यांना पाठवलेल्या मेसेजनंतर त्यांनाही चॅट बॉक्समध्ये ब्लू टिक दिसणार नाहीत. 

ही सेवा एनबल करण्यासाठी युझर्सना व्हॉट्सअपचं लेटेस्ट व्हर्जन डाऊनलोड करावं लागेल. याचं अपडेटेड व्हर्जन 2.11.44 असून ते फक्त व्हॉट्सअपच्या साईटवर उपलब्ध आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.