तुम्हाला १ कोटी रूपये दिले तर....

तुम्ही काय करणार... याचा विचार तुम्ही केला आहे का?,

Updated: Jan 31, 2016, 04:23 PM IST
तुम्हाला १ कोटी रूपये दिले तर.... title=

मुंबई : तुम्हाला परत न करण्याच्या अटीवर १ कोटी रूपये दिले तर, तुम्ही काय करणार... याचा विचार तुम्ही केला आहे का?, कारण अनेक वेळेस माझ्याकडे पैसे नाहीत, नाही तर मी असं काही केलं असतं की साऱ्या जगात माझं नाव झालं असतं, असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला पैसे मिळाले तर तुम्ही नेमकं काय करणार, हे तुम्हाला सांगायला जमेल का?

मात्र या १ कोटी रूपयात अनेक गोष्टी अशा देखील असतील की तुम्हाला त्या पैशांवर खरेदी करता येणार नाहीत. अर्थातच जग सोडून गेलेले जवळचे व्यक्ती, जसे आई, बाबा, बहिण अथवा भाऊ, किंवा बायको मुलं...

या १ कोटी रूपयात तुम्हाला सर्वच खरेदी करता येईल असं नाही, म्हणजेच पैशांवर सर्वच खरेदी करता येत नाही, किंवा मिळवता येत नाही, मात्र असं कोणतं काम आहे, ज्यामुळे तुमचं घोडं अडलंय, की फक्त पैशांचं कारण दाखवून तुम्ही टाळाटाळ करतात, आणि काहीच करू शकत नाही... तेव्हा व्यक्त करा, तुम्हाला १ कोटी रूपये दिले तर...