मुंबई: मोबाईल फोनचा वापर करणाऱ्यांसाठी एक खूप महत्त्वाची बातमी आहे. देशात ४जी लॉन्च झाल्यानंतर इंटरनेटच्या दरांमध्ये घट होणार आहे. त्यामुळे नेटची स्पीडही वाढेल. मार्चपासून ही नवी सेवा सुरू होणार आहे आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इंटरनेट कंपन्याही चांगली ऑफर दिलीय.
काही टेलिकॉम कंपन्यांनी आतापासूनच मोबाईल फोनचे दर कमी करायला सुरूवात केलीय. याचं ताजं उदाहरण म्हणजे आयडिया... कंपनीनं आपले दर कमी करून मोठ्या संख्येनं ग्राहकांना आपल्याकडे वळवलंय. मागील वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत कंपनीनं सर्वाधिक सिमची विक्री केलीय.
४G सेवेत रिलायंसच्या उतरण्यानं स्पर्धा अधिक तीव्र झालीय आणि सर्व कंपन्यांचंच त्याकडे लक्ष लागलंय. टेलिकॉम कंपन्यांना मोबाईल धारकांनी इंटरनेटचा अधिकाधिक वापर करावा, असं वाटतं. कारण त्यांनी त्यावर खूप खर्च केलाय. सध्या ८५ टक्के मोबाईल धारक इंटरनेटचा वापर करत नाहीत. आता कंपन्या याच ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.