मुंबई: बोटाच्या एका इशाऱ्यावर आपण आपला फोटो, व्हिडिओ आपल्या मित्रमंडळी, नातेवाईंकापर्यंत पोहोचवू शकता. सध्या या अॅपमध्ये सर्वात आघाडीवर आहे व्हॉट्स अॅप... आज व्हॉट्स अॅपचे जगभरात सात कोटींहून अधिक युजर्स आहेत.
जाणून घ्या व्हॉट्स अॅपचे काही खास फायदे आणि तोटे...
१. या मॅसेजिंग अप्लिकेशनचा फायदा हा आहे की, आपल्याला टेलिकॉम कंपन्यांच्या अवाजवी कॉल आणि मॅसेज रेट्सपासून सुटका मिळते. आज सर्व टेलिकॉम कंपन्या सणांच्या दिवशी आपले स्टँडर्ड कॉल आणि मॅसेज रेट्स लागू करतात. अशात जर आपण व्हॉट्स अॅप युजर आहात तर आपल्याला काळजी करावी लागत नाही.
२. साधारण मोबाईल मॅसेजमध्ये आपल्याला कॉमन टेक्सशिवाय आणखी काही ऑप्शन नसतं. व्हॉट्स अॅपचा वापर करून आपण टेक्स्टसोबतच अनेक स्माइलीज सुद्धा टाकू शकता. स्मार्टफोनच्या भाषेत याला इमोजी म्हणतात.
३. आजच्या काही वर्षांपूर्वी एखादी फाइल किंवा इमेज शेअर करण्यासाठी मेलचा वापर करावा लागायचा. आज इन्स्टंट मॅसेजिंग अॅपच्या मदतीनं आपण बोटाच्या इशाऱ्यावर इमेज आणि इतर शेअरिंग करू शकतो.
४. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की, आता आपल्या मित्रांच्या घरी जावून डोअरबेल वाजविण्याऐवजी आपले मित्र व्हॉट्स अॅपवर मॅसेज करणं पसंत करतात. याचा फायदा असा की, आपल्याला ज्याला बोलवायचं आहे त्यालाच मॅसेज करून बोलावू शकता. डोअरबेल वाजवून संपूर्ण घराला उठवण्याची गरज नसते.
५. पहिले तर आपण आपल्या फीचर फोनवर ग्रृप चॅट करत होतात तेव्हा आपल्या आवडत नसलं तरी आपल्या मित्रांचे मॅसेज वाचावे लागत होते. आता आपण व्हॉट्स अॅप ग्रृप चॅटवर मॅसेज म्युट करू शकता.
इन्सटंट मॅसेजिंग अॅपचे नुकसान -
प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. जर आपण कोणत्या गोष्टीत चांगलं शोधता तर त्यात काही वाईटही असतं. हीच बाब व्हॉट्स अॅपच्या बाबतीतही लागू होते.
१. आतापर्यंत आपल्याला बँकेतून लोनसाठी, क्रेडिट कार्ड वाले आणि आपल्या आवडीची डायलर टोन लावण्यासाठीचे मॅसेज आणि फोन यायचे. मात्र आता टेलिमार्केटिंग कंपन्या व्हॉट्स अॅपद्वारे आपल्या प्रॉडक्ट्सची मार्केटिंग करण्याची स्ट्रॅटेजी वापरत आहेत.
२. मॅसेजिंगच्या या माध्यमाची सर्वात मोठी समस्या म्हणजे आपली प्रायव्हसी आहे. तंत्रज्ञानाच्या या बदलत्या स्थितीत आपल्याला माहिती नसतांना आपलं बोलणं कुणी वाचत, ऐकत असेल तर सांगता येत नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.