आयफोनला २४ तासात ४० लाख लोकांकडून मागणी

अॅपल फोनला स्वस्त फोन्समुळे स्पर्धेचा सामना करावा लागेल, असं म्हटलं जात होतं, मात्र एका दिवसात तब्बल ४० लाख आयफोन्सची मागणी करण्यात आली आहे.

Updated: Sep 16, 2014, 10:25 AM IST
आयफोनला २४ तासात ४० लाख  लोकांकडून मागणी

न्यूयॉर्क : अॅपल फोनला स्वस्त फोन्समुळे स्पर्धेचा सामना करावा लागेल, असं म्हटलं जात होतं, मात्र एका दिवसात तब्बल ४० लाख आयफोन्सची मागणी करण्यात आली आहे.

जगभरातून अॅपल कंपनीने नुकताच सादर केलेल्या आयफोन 6 आणि आयफोन 6 प्लसला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. फोन लॉन्च केल्यानंतर चोवीस तासांतच 40 लाख आयफोन्सची मागणी झाली.

नव्या आयफोनचे वाटप 19 सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याचं अॅपल कंपनीने म्हटलं आहे, मात्र, काही ठिकाणी आयफोन ऑक्टोबरमध्ये पुरविण्यात येणार आहेत. शुक्रवारी आयफोन सादर झाल्यानंतर वेबसाईटवर मोठ्या प्रमाणात ऑर्डर देण्यात आल्याने वेबसाईट काहीकाळ बंद झाली होती. 

आयफोन 6 ची भारतात 50 हजार रुपयांहून अधिक किंमत असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या हा फोन फक्त अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, हाँगकाँग, जपान, सिंगापूर आणि युकेमध्ये विक्रीस उपलब्ध आहे.

अॅपलच्या उत्पादनांना जगभरातून मोठी मागणी असते. गेल्यावर्षी अॅपलच्या आयफोनची तीन दिवसांत 90 लाख हँडसेटची विक्री झाली होती. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.