केरळची IPS अधिकारी Facebook वर झाली व्हायरल!

केरळची आयपीएस अधिकारी मरीन जोसेफ फेसबुकवर व्हायरल झालीय. मरीननं जेव्हापासून कोच्चीची एसीपी म्हणून काम सांभाळलंय. तेव्हापासून ती सोशल नेटवर्किंग साईटवर चर्चेत आहे. अनेक युजर्स तिच्या सौंदर्याची स्तुती करतायेत. तर अनेक जण तिच्या हातून अटक करवून घेण्यास उत्सुक झाले आहेत. 

Updated: Sep 11, 2014, 04:40 PM IST
केरळची IPS अधिकारी Facebook वर झाली व्हायरल! title=

कोच्ची: केरळची आयपीएस अधिकारी मरीन जोसेफ फेसबुकवर व्हायरल झालीय. मरीननं जेव्हापासून कोच्चीची एसीपी म्हणून काम सांभाळलंय. तेव्हापासून ती सोशल नेटवर्किंग साईटवर चर्चेत आहे. अनेक युजर्स तिच्या सौंदर्याची स्तुती करतायेत. तर अनेक जण तिच्या हातून अटक करवून घेण्यास उत्सुक झाले आहेत. 

काही मुलांनी तर हे सुद्धा म्हटलं की, आम्ही जाणून-बुजून चोऱ्या करू आणि तिच्या हातून अटक करवून घेवू. एका फेसबुक पेजवर तिच्या स्वागताचा फोटो पोस्ट केला गेलाय. मात्र ही बातमी खोटी निघाली. तरीही फेसबुकवर तिच्या फोटोवर लाइक्स आणि शेअरचा पाऊस पडला. एवढंच नव्हे तर व्हॉट्स अॅपवर पण तिचा हा फोटो खूप शेअर होतोय. 

लोकांचे इतके मॅसेज आणि लाईक्स पाहून मरीननं एक पोस्ट शेअर केली. त्यात तिनं लिहिलंय की, “हे खोटं आहे की, मी कोच्चीची नवीन एसीपी आहे. मी सध्या हैदराबादमध्ये एनपीएचं ट्रेनिंग घेतेय.”

डेप्युटी कमिश्नर मोहम्मद रफीक यांनी सांगितलं, मरीन जोसेफ एक आयपीएस ट्रेनी आहे, ती कोच्चीमध्ये दोन आठवडे ट्रेनिंगसाठी होती आणि आता परत गेलीय. नुकतंच मरीनला Y20 ऑस्टेलिया समिटसाठी भारतीय प्रतिनिधीमंडळात निवडलं गेलंय.  

मरीन 2012मध्ये पहिल्याच झटक्यात यूपीएससी पास झालीय. तिनं दिल्लीतील स्टीफंस कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केलं. सध्या केरळमध्ये दोन मल्याळी आयपीएस अधिकारी आहेत आर. श्रीलेखा आणि बी.संध्या. 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.