www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ऑईल अँड नॅच्युरल गॅस कार्पोरेशन लिमिटेड (ONGC)मध्ये टेक्निशिअन आणि ज्यू. फायरमनच्या पोस्टसाठी नोकरीची संधी आहे. २९ नोव्हेंबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
१. असिटंट टेक्निशिअन (इलेक्ट्रॉनिक्स) A2 level – ८ जागा
> वयोमर्यादा: जास्तीतजास्त ३०
> शिक्षण: डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर
> पगार – १२ हजार २७ हजार
२. ज्यू. फायरमन W1 Level – ५ जागा
> वयोमर्यादा: जास्तीतजास्त २५
> महाविद्यालयीन शिक्षण सोबत फायरमन डिप्लोमा आणि ड्रायव्हिंग लायसंस
> पगार – १० हजार १८ हजार
३. निवडीची पद्धत
> निवड लिखीत परिक्षा, इंटरव्ह्यू, ड्रायव्हिंग टेस्ट
> पोस्टनुसार निवड
असिस्टंट टेक्निशिअन (इलेक्ट्रानिक्स) A2 Level :
१. लेखी चाचणी
२. मुलाखत
ज्यू. फायरमन W1 Level :
१. लेखी चाचणी
२. मुलाखत
३. शारीरीक प्रमाण चाचणी
४. शारीरीक क्षमता चाचणी
५. ड्रायव्हिंग टेस्ट
कशी असेल लेखी चाचणी:
विषयाशी निगडीत १०० प्रश्न
सामान्य ज्ञानाचे २० प्रश्न
एकूण १२० मार्कांची ही परिक्षा Objective असेल.
अर्ज करण्याची पद्धत:
अर्जाची फी १००/- (SC/ST) साठी तर रु. ३००/- इतर आणि ओबीसी उमेदवारांसाठी
अर्जाची फी ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत चालानच्या रुपात भरावी.
सर्व उमेदवारांनी आपला अर्ज संपूर्ण माहितीसह भरावा.
उमेदवारी अर्जासह ओएनजीसी चालान स्लीपसह स्वत:चा फोटो आणि शैक्षणिक कागदपत्र, वयाचा दाखला, जात प्रमाणपत्र, अनुभवाचं प्रमाणपत्र इत्यादी...
अर्जावर अर्ज कोणत्या पोस्टसाठी करतोय हे खालील पत्त्यावर पाठवावं.
पत्ता-
DGM (IE)-Rectt., Ground Floor, B-Wing,
Green Hills, Tel Bhavan,
ONGC, Dehradun, PIN-248003
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.