मुंबई: लेनोवे यावर्षी दिवाळीच्या निमित्तानं खास नवे स्मार्टफोन्स लॉन्च करतेय. सर्वाधिक आतुरता आहे ती, A6000 ची... भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या ४जी स्मार्टफोन सीरिजचा शक्तीशाली रूप आहे.
लेनोवो 'A6000 शॉट'
लेनोवो 'A6000 शॉट'मध्ये इन-बिल्ट १३ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, स्नॅपड्रॅगन ४१० क्वाडकोर प्रोसेसर आणि २जीबी रॅम आहे. ४जी संचालित ए६००० शॉट जगातील पहिल्या अशा स्मार्टफोनमध्ये सहभागी झालाय. जो डॉल्बी एटमॉस तंत्रज्ञानासोबत ३६० डिग्री सराउंड साउंड अनुभव देणारा आहे.
लेनोवो A1000
बजेट लक्षात घेता खरेदी करणाऱ्यांसाठी एक पॉवर पॅक्ड ए१००० आहे. जो भारतात लेनोवोच्या यशस्वी सीरिजमधील नवा पाहुणा आहे. फोनमध्ये १.३जीएचझेड क्वाडकोर प्रोसेसर आहे. यात १जीबी रॅम, ८जीबी इंटरनल मेमरी आहे आणि यात अँड्रॉइड लॉलिपॉप ५.० आहे. पहिल्यांदा स्मार्टफोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी ए१००० कमी किमतीत चांगले फीचर्स देणारा फोन आहे.
आणखी वाचा - आले सण, ऑनलाइन खरेदी करताना ही काळजी घ्या
लेनोवो ए६००० शॉट, ए १००० आणि के३नोट म्यूझिक अॅडिशन ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात देशातील प्रमुख शहरांमध्ये रिटेल आउटलेट्समध्ये उपलब्ध असेल. या फोन्सची किंमत क्रमश: ९९९९ रुपये, ४९९९ रुपये आणि १२,९९९ रुपये असेल.
लेनोवोचे डायरेक्टर (स्मार्टफोन्स) सुधीन माथुर म्हणाले, 'आमच्या उत्पादनाची रेंज ही ग्राहकांच्या मागणीवर आधारित असते. गेल्यावर्षी आमच्या ४जी पोर्टफोलियोच्या वाढत्या मागणीसाठी ग्राहकांचं प्रोत्साहन अधिक राहिलं. आता आम्ही आमच्या ग्राहकांना अधिक चांगली सेवा देऊ इच्छितो. आम्ही दिवाळीत आपले खास सर्वाधिक लोकप्रिय स्मार्टफोन विशेष फीचर्ससह लॉन्च करत आहोत.'
आणखी वाचा - 360 अंशात स्क्रीन वळवणारा... 'लेनोवो योगा 300'!
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.