एलजीचा दुहेरी कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च

एलजी इलेकट्रॉनिक्स कंपनीने भारतात नविन एक्स दुहेरी कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च केला आहे.

Updated: Aug 29, 2016, 02:50 PM IST
एलजीचा  दुहेरी कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च title=

मुंबई: एलजी इलेकट्रॉनिक्स कंपनीने भारतात नविन एक्स दुहेरी कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च केला आहे.

एलजीच्या या स्मार्टफोनची किमंत 18,999 मध्ये बाजारात उपलब्ध आहे.

'एलजी एक्स कॅम' स्मार्टफोनमध्ये मागे दोन कॅमेरा आहेत, या स्मार्टफोनला स्क्रीन सेफ्टीसाठी 3D ग्लासचा वापर केला आहे.

या स्मार्टफोनची स्क्रीन 5.2 इंच असून फुल एचडी डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनचे वजन फक्त 118 ग्रॅम आहे.

एलजी एक्स स्मार्टफोनमध्ये 2 जीबी रॅम आणि 16 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. या स्मार्टफोनचा फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सल असून, 13 आणि 5 मेगापिक्सलचे 2 रेअर कॅमेरे आहेत.  अँड्रॉईड 6.0 मार्शमेलो यात आहे

या स्मार्टफोनमध्ये वाय-फाय 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ वी 4.2 जी/पी/एस/ ए-जी/पी/एस/ आहे.

एलजी एक्स हा स्मार्टफोन बाजारात वेगवेगळ्या रंगामध्ये उपलब्ध आहे. यात 3.5 ऑडियो जॅक एफएम रेडिओ आहे.

एंबियंट लाइट सेंसर, प्रॅाक्सिमिटी, मॅगनेटोमीटर, आणि माइक्रो-यूएसबीचा समावेश या स्मार्टफोनमध्ये आहे.